Marathi Ghazal by Atmaram Raoji Deshpande

Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Marathi Ghazal by Atmaram Raoji Deshpande

 मराठी गज़ल

आत्माराम रावजी देशपांडे (सांगाती)

मराठी गज़ल


जीव लागत नाही माझा असा एक दिवस येतो

कधी अधुन मधून केव्हा लागोपाठ भेट देता

 

अशा दिवशी दुरावलेले उजाड सारे आसपास

घर उदास बाग उदास लता उदास फुले उदास

 

वाटते आयुष्य अवघे चार दिवसाचेच झाले

कसे गेले कळले नाही हाती फार थोडे आले

 

दोन दिवस आराधनेत गेले दोन प्रतीक्षेत गेले

अर्धे जीवन प्रत्नांत अर्धे विवंचनेत गेले

 

आस हरपलेली असते श्सास थकले वाटतात

आश्रू बाहे गळत नाहीत आत जळत राहतात

 

आत्माराम रवजी देशपांडे (सांगाती)

Post a Comment

0 Comments